नगर मनपाच्या आयुक्तांबाबत खासदार निलेश लंके यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नुकताच अहमदनगर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी अहमदनगर मनपाचा पदभार स्वीकारला आहे. मात्र याबाबत खा.निलेश लंके यांनी आक्षेप नोंदवला आहे. या आधीचा अधिकारी भ्रष्टाचारी होता आणि नव्याने आलेला अधिकारी त्याच तोडीचा असल्याची चर्चा आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील निलेश लंके यांनी म्हटले आहे.

अहमदनगर मनपा तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावर झालेल्या लाच मागणीच्या आरोपानंतर आयुक्त जावळे व त्यांचे स्वीय सहायक देशपांडे असे दोघेही पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान या काळात आयुक्तपदावर कोणी नसल्याने महापालिकेतील बरीच कामे प्रलंबित होती . तसेच अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार दिलेला होता मात्र प्रशासक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार असल्याचा उल्लेख त्यांना दिलेल्या पत्रात नव्हता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पवार यांच्या रूपाने नवीन आयुक्त मिळाल्याने नगरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.

मात्र पवार यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी यात नवा ट्वीस्ट आला. अन अवघ्या २४ तासातच पवार यांच्याऐवजी पिंपरी चिंचवड येथे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले यशवंत डांगे यांची अहमदनगर मनपाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली.

मात्र आता डांगे यांच्या नियुक्तीवरून देखील चांगलीच राजकीय धुळवड सुरु आहे. नगरचे खासदार निलेश लंके यांनी या आधीचा अधिकारी भ्रष्टाचारी होता आणि नव्याने आलेला अधिकारी त्याच तोडीचा असल्याची चर्चा आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान प्रशिक्षणार्थी जिल्हा अधिकारी पूजा खेडकर यांनी असे वागायला नको होते. अशी देखील प्रतिक्रिया अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. पूजा खेडकरांच्या वर्तनाची वरिष्ठ वातळीवर दखल घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पूजा खेडकर या निवृत आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत . तर दिलीप खेडकर यांनी निलेश लंके यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रशिक्षणार्थी जिल्हा अधिकारी पूजा खेडकर या मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

याबाबत लंके म्हणाले की, नवीन अधिकाऱ्यांची अशी वागणूक बरी नाही, त्यांनी असे वागायला नको होते. त्यांच्या वडिलांचीदेखील सर्व्हिस झाली आहे. अधिकारी जुना असो की नवा, त्यांची वर्तवणुक चांगली असावी. अन्यथा वरिष्ठ पातळीवर याची दखल घ्यायला हवी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe