अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महिला कर्मचार्यांच्या तक्रारींवर चौकशी करून महिला तक्रार निवार समितीने दिलेल्या अहवालानंतर महापालिकेतील आस्थापना प्रमुख असलेले मेहेर लहारे यांची बदली करण्यात आली होत.
मात्र महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक करणाऱ्या या मेहेर लहारे यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सेनेचे शहरप्रमुख सातपुते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेतील आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांना त्रास देणे, महिलांची छेड काढणे, विनाकारण त्रास देणे, याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत.
मात्र लहारे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त यांनी लहारे यांची बदली केली होती. परंतु त्यास स्थागिती देण्यात आली असून, लहारे यांची अस्थापनाप्रमुख पदावरून तातडीने हकालपट्टी करवी, अशी मागणी सातपूते यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.