अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्राहक शोधून त्यांना चोरीच्या महागड्या गाड्या कमी किमतीत विकल्यानंतर पुन्हा जीपीएसच्या सहायाने त्याच गाड्यांची चोरी करुन त्याची विक्री करण्याचा उद्योग करणारी आंतरराज्यीय टोळी नगरच्या कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे.
दि. २० जुलै रोजी फिर्यादी गणेश संपत लापरे, (वय ३५ वर्षे, रा. तुळजाभवानी नगर, सिटी प्राईट हॉटेलजवळ, एकविरा चौक, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, त्यांचा प्रॉपर्टी बोकर्सचा व्यवसाय आहे.
त्यांनी स्वतःच्या वापराकरिता फोर्च्युनर गाडी (क्र.एम.एच १२ पी.सी १२२१) ही करारनामा खरेदी पावती करून नोटरी पब्लीकव्दारे दि. १४ फेब्रुवारी 20 रोजी खरेदी केली होती.
दि. १९ जुलै रोजी दुपारी १२.०० ते १२.२० वा. कलेअराबुस ग्रांउड फोर्च्युनर गाडी लॉक व पार्क करुन ठेवली असताना, गाडी विक्री करणारे तबरेज इक्बाल शेख,( पुणे) व सरफराज एम सय्यद (रा. मंगळवार पेठ, पुणे) व एजंट सय्यद फरीद फारुक ( रा. मुकुंद नगर,)
यांनी त्यांच्यावतीच्या इसमांना फिर्यादीवर पाळत ठेवण्यास सांगुन विक्री केलेली नमुद गाडी दुस-या चावीचा वापर करुन चोरी करुन नेली. या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी , कर्मचारी यांना मार्गदर्शन करुन सुचना देवुन आरोपींचा शोध सुरु केला.
आरोपीचे गुन्हयात नमुद केलेल्या नावावरुन व प्राप्त सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपींचा पुणे येथे शोध घेवुन आरोपी तबरेज इक्बाल शेख (रा. कोंडवा खुर्द, पुणे), सरफराज सलिम शेख (रा मंगळवार पेठ, पुणे.),
अभिजीत सचिन कदम, (वय १८ वर्षे, रा. हातमपुरा, अहमदनगर), मोहम्मद अली रईस शेख (रा. पाचपीर चावडी अहमदनगर), दानिश हुसेन शेख (रविवार पेठ ,पुणे) यांना अटक केली.
त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याचेकडुन माहीती प्राप्त झाली की, मुख्य आरोपी अन्योनी उर्फ टोणी दास अर्कस्वामी (हल्ली राहणार हेद्राबाद)
हा असुन प्रथम गहाण ठेवलेल्या महागड्या गाडयांची कमी भावात विक्री करुन रोख स्वरुपात पैसे प्राप्त करुन घेवुन, पुढील दोन महिन्यात गाडीचे पेपर व ती नावावर करुन देवु असे नोटरीत नमुद करण्यात येत होते.
ग्राहकास डुप्लीकेट चावी देवुन ओरिजनल चावी ही त्यांचेडच ठेवुन महागडया कारचा पुन्हा पाठलाग करुन ओरिजनल चावीचा वापर करून गाडीची चोरी करुन घेवुन जावुन ती पुन्हा बाजारात कमी भावात विक्री करण्यासाठी ठेवली जात होती.
आरोपी यांचे कडुन नमुद गुन्ह्यातील गेलेला माल व गुन्हा करते वेळी वापरलेली वाहने असा एकुण ३९,८०,०००/- रु किंमतीचा मुदेदमाल हस्तगत केला आहे. आरोपी यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved