अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-राहाता नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊनमध्ये डांबून ठेवला आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे बसावयाचा त्यासंदर्भातील इतर माहिती आठ दिवसांच्या आत नगर परिषदेने प्रसार माध्यमांन मध्ये प्रसिद्ध करावी
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदना व्दारे दिला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहता नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवसांपासून गोडाऊन मध्ये आणून ठेवलाआहे. त्या संदर्भात अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते या विषयी आंदोलने करत आहेत. परंतु या विषयी आपणआपल्या ताब्यातील पुतळा कोणत्या करणाने बंदिस्त करण्यात आला आहे, कोणत्या ठिकाणी बसविण्यासाठी आणण्यात आला आहे, कोणती जागा आरक्षित केली आहे,
त्या संदर्भात पालिकेने कोणकोणत्या विभागाची परवानगी घेतली आहे, तसेच आजपर्यंत कोणकोनते ठराव या पुतळ्या विषयी करण्यात आले,
ही सर्व माहिती आठ दिवसात नगर परिषदेने प्रसिध्द करावी अन्यथा आपल्या कार्यालयास कोणतीही पूर्व सूचना न देता अखिल भारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात येईल.
या होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी हि राहता नगर परिषदेची असेल याची नोंद घ्यावी. निवेदनावर जिल्हाध्यक्ष, नितीन पटारे, जिल्हा संपर्क प्रमुख सुहास निर्मळ,
तालुका अध्यक्ष अतुल चौधरी, तालुका कार्याध्यक्ष सुरेश ठोके, जिल्हा संघटक दादा बडाख पाटील, भिल्ल संघटना तालुकाध्यक्ष सुभाष मोरे, आरपीआसयचे सुभाष कापसे, तालुका संघटक विजय तेलोरे यांच्या सह्या आहेत.