अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. आज 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत आहे. यामुळे विक्रमी अर्ज दाखल होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
यातच जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल एकाच दिवसात 14 तालुक्यांतून 6 हजार 433 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून यामुळे आतापर्यंत दाखल अर्जाची संख्या आता 8 हजार 45 झाली आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस असून तांत्रिक कारणामुळे उमदेवारी दाखल करण्यास उशीर होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने पारंपारिक पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल अडीच तासांनी वेळ वाढवून दिला आहे.
यामुळे यंदाच्या ग्रामपंचायात निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शेवटच्या तीन दिवसांत गर्दी होण्याचा अंदाज आल्याने प्रत्येक तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यादृष्टीने उपाययोजना आणि पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे.
दरम्यान अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिसावं असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल होणार असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.