बनावट फेसबूक अकाउंट; महिलेवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-सोनई येथील संभाजी चौकात टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एस कुमार टेलरचे मालक रामकृष्ण जनार्दन आगळे (४४) यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट तयार करून त्यांची व कुटुंबाची बदनामी करण्याच्या

उद्देशाने अश्लील व्हिडिओ इमेजेस व्हायरल केल्याच्या आरोपावरून देहरे (तालुका नगर) येथील महिलेविरुद्ध नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, फेसबूक पहात असताना मला ‘रामकृष्ण आगळे’ या माझ्याच नावाचे फेसबूक अकाउंट दिसले. त्यावर अश्लिल व्हिडिओ इमेजेस अपलोड करून आमची बदनामी केली जात असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर अकाउंट बंद झाले. २९ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा माझ्या नावाचे फेसबूक अकाउंट दिसले. त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड केले होते. स्क्रीन शॉट काढून तक्रार दाखल केली.

चौकशी करता त्या फेसबुक अकाउंटमधील मोबाइल नंबर व ई-मेल एका महिलेचा असल्याचे लक्षात आले. त्यानुसार देहरे (तालुका नगर) येथील महिलेविरुद्ध नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24