अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. मात्र नड राहिली कि सोने गहाण ठेवून पैसा उपलब्ध करता येतो. यासाठी नागरिक देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. तसेच सोनेतारण करून बँकेकडून कर्ज घेता येते.
मात्र राहूरी तालुक्यातील एका सहकारी बँकेच्या शाखेत बनावट सोने तारण ठेऊन कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून बँकेचे व्यवस्थापक तथा सराफ अडचणीत येणार आहे.
राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील प्रवरा पट्ट्यातील एका गावात सहकारी बँकेची शाखा आहे. काही दिवसांपूर्वीच या बँकेतील सोनेतारण लिलावाची एका वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
राहुरी शाखेतील वरिष्ठ अधिकारी यांना या प्रकरणाचा कानोसा लागल्याने त्यांनी संबंधित गावातील त्या शाखेत जाऊन तारण ठेवलेले सोने तपासले असता, ते बनावट असल्याचे समोर आले.
त्यानंतर पुन्हा याच बँकेतील शाखेत असलेले तारण सोने तपासणीसाठी नेले, ते देखील बनावट निघाल्याने आता या प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अनेक अधिकारी व कर्मचारी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत, यातील दोषीं अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved