अहमदनगर बातम्या

अपघाताचा बनाव करून 30 लाखाचा लसून विकला; विकणाऱ्यांसह घेणाराही ताब्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वाहनाचा अपघात झाल्याचा बनाव करून ३० लाखाचा लसून विकणारे दोघे व घेणारा एक असे तिघे आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सनवरलाल अंबालाल जाट,

रवीकांत काळुराम सेन (दोघे रा. छपरी, ता. भिलवाडा, राज्य राजस्थान ) व रामदास तुकाराम बोलकर (रा. नेवासा रोड, ता. श्रीरामपूर) असे त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, साकत (ता. नगर) शिवारात ट्रकला अपघात झाल्याचा बनाव करून ट्रकमधील ३९ लाख ९१ हजार ६०० रुपये किंमतीचा लसून मध्यस्तीमार्फत परस्पर विकण्यात आला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी वेगाने फिरविला असता सनवरलाल जाट, रवीकांत सेन, रामदास बोलकर यांना ताब्यात घेण्यात आले. सनवरलाल याने अपहार केलेला लसून सेन यांच्या मध्यस्तीने रामदास बेलेकर यास विकला. सदरील माल खानापूर शिवारातील गोडावूनमध्ये ठेवला होता. मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोना. रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office