अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
आदिक यांच्या आईच्या नावे पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने, असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तसेच मागील वर्षी ओल्या दुष्काळमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
मागील वर्षी गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याच्या फुगवठ्यामुळे त्यांच्या डाळिंब बागेची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. डाळिंब बागेचा पिक विमा भरलेला असतांनाही विमा कंपनीकडून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही.
या नुकसानीमुळे शेतकरी अशोक नेहमी तणावात राहत होते. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर त्यात निसर्गाचा कोप यामुळं त्यांच्या डोक्यावर प्रचंड ताण आला होता.
या नैराश्यातून त्यांनी २२ जुन रोजी रात्री ८:३० वाजेदरम्यान आपल्या स्वत:च्या शेतात कीटक नाशक औषध प्राशन केले होते. त्यावर त्यांना तातडीनं श्रीरामपूर येथील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारा दरम्यान शुक्रवार दि.२६ रोजी पहाटे ४:४६ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews