विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील मांजरी येथील विहिरीत पडलेल्या पांडुरंग महानोर वय ५५ या शेतकऱ्याचा मृतदेह ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला.

तालुक्यातील मांजरीच्या मुळा नदीपात्रालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पुरातन विहिरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पांडुरंग महानोर हे पाय घसरून विहिरीत पडले होते.

या घटनेची खबर परिसरात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. बाज विहिरीत सोडून दोराच्या सहाय्याने रावसाहेब बनकर, सुनील विटनोर, सुनील शिंदे, भाऊसाहेब माळी,

बाळासाहेब पवार यांनी विहिरीतील पाण्यात बुड्या मारून तब्बल तीन तास शोध घेतला. मात्र विहिरीत भरपूर पाणी तसेच तळाला गाळ असल्याने हे प्रयत्न व्यर्थ ठरले.

या घटनेबाबत मांजरी येथील पत्रकार दीपक दातीर यांनी निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता उपनिरीक्षक सचिन बागुल व पोलिस पथकाने घटनास्थळी जावून विठ्ठल विटनोर,

दादासाहेब विटनोर] अग्निशमन दलाचे विलास गडाख, राजेंद्र पवार, जय पवार, सिद्धार्थ मोरे यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24