विहिरीत उडी मारून शेतकऱ्याने संपविले जीवन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील सचिन कोबरणे या ३० वर्षीय शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनीच विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली.

पिकांवर औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने वडिलांनी शोध घेतला.

विहिरीजवळ सचिनची चप्पल होती. विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सचिनचा मृतदेह हाती लागला.

मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी हंबरडा फोडला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.

त्याची पत्नी चार महिन्यांची गर्भवती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काॅन्स्टेबल मोकाटे करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24