अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : मिरचीच्या शेतात शेतकऱ्याने लावला गांजा ! पोलिसांना समजताच…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे मिर्चीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे उघड झाले असून, कर्जत पोलिसांनी ४ लाख २९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आळसुंदे ते कोर्टी रोडचे बाजुस एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात गांजाची लागवड केली आहे. सदर माहिती मिळताच पोलीसांनी आळसुंदे गावचे शिवारात कारवाई केली.

या कारवाईमध्ये ४,२९, ८२० रुपये किमतीचा एकूण २१.४९१ किलो ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा ओलसर झाडे असलेला गांजा किंमत २० हजार रुपये किलो प्रमाणे जप्त करण्यात आला आहे.

आळसुंदे ते कोर्टी रोडलगत बाळु मारुती गार्डी, वय ४५ वर्षे, रा. आळसुंदे, ता. कर्जत याने त्याच्या शेती गटनंबर ३३० मधील शेतात मिर्चीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले असून, त्यास ताब्यात घेण्यात आले असून, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधीकारी विवेकानंद वाखारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. घनशाम बळप, पोसई प्रदिप बोऱ्हाडे, पोसई मंगेश नागरगोजे, पोना. पी. टी. भांडवलकर, पोकॉ. शाहराज तिकटे,

पोका, कोल्हे पोका. शाहराज तिकटे, पोका, कोल्हे पोका. कोहक, पोकॉ. सुपेकर, चापोकॉ. बेग यांच्यासह नायब तहसिलदार प्रदिप ठोंबरे, तलाठी मोराळे, व कृषी कार्यालय, कर्जत यांच्या कर्मचाऱ्यां यांनी केली. पुढील तपास पोसई मंगेश नागरगोजे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office