अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो.
त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव वाढलेला पाहायला मिळाला.
शहरात सकाळी झेंडूने 300 प्रति किलोचा दरही गाठला होता. तर आपट्याच्या पानांची गड्डी 20 रुपयांनी विकली गेली. शनिवारी सायंकाळी 200 ते 250 रुपये दराने विकली जात होती.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात चारपटीने वाढ झाली. दसरा व दिवाळी डोळ्या समोर ठेवून नगर व पारनेर तालुक्यांतील शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात.
मात्र या वर्षी अतिवृष्टीमुळे फूल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतून वाचलेल्या फुलांनी आज चांगलाच भाव खाल्ला. झेंडू 300 रुपये, शेवंती 300 ते 350, ऍस्टर 350 रुपये प्रति किलो दराने विकले गेले.
अतिवृष्टीचे कारण देत व्यापाऱ्यांनी फुले खराब होतात असे सांगत शेतकऱ्यांकडून 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने झेंडूची फुले खरेदी केली. मात्र आज हीच फुले व्यापाऱ्यांनी 300 रुपये प्रति किलोने ग्राहकांना विकली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved