अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील काही शेतकऱ्यांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली.

दरम्यान या शेतकऱ्यांनी महामाहीम राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी आधीच वेळ देण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत राज्यपालांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्यपाल महोदयांनी त्यांनाआज ( ०३ ऑक्टोबर २०२०) रोजी सकाळी ११:३० वाजता भेटीचे निमंत्रण दिले त्यानुसार राजभवनातील राज्यपालांच्या निवासस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ४० मिनीटांचा वेळ दिला.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या सर्व समस्यावर राज्यपाल महोदयां बरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे दुःख शेतकरी संतोष भागडे यांनी त्यांच्या कानावर घातले आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या समस्या वर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी राज्यपाल भगतसिगं कोश्यारी यांना केली.

राज्यपाल हे राज्याचे संविधानात्मक प्रमुख तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधील दुवा असल्याने निश्चितच बळीराजाचे दुःख समजून घेऊन त्यांच्याकडून शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आहे,

अशी भावना संतोष भागडे यांनी व्यक्त केले. दरम्यान युवा कीर्तनकार दादा महाराज रंजाळे यांच्यासह ते आता गावाकडे रवाना होणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24