अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली होती. यामुळे कांडा उत्पादाक शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला होता. मात्र नुकतेच कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 19 हजार 772 गोण्या आवक झाली. एक नंबर कांद्याला 3500 ते ४००० रुपये भाव मिळाला.
दोन नंबरला 2800 ते 3000 रुपये, गोल्टी कांद्याला 2500 ते 3000 रुपये, जोड कांद्याला 1300 ते 1500 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.
काही वक्कलांना 4200 पर्यंत भाव मिंळाला. लाल कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने लाल कांदा पिक घेतलेल्या शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त आहे.
कांद्याच्या भावात चांगली वाढ झाली असली तरी ही वाढ तात्पुरती आहे. कारण पुढील महिन्यात गावरान कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात आवक वाढून भाव कोसळणार आहेत.