चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात, दुष्काळ जाहीर करून चाराडेपो सुरु करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News: मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पारनेर तालुक्यातील अनेक भागात पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत,

मराठा आंदोलकरांवर लाठीचार्ज करणाऱ्याबाबत आंदोलकांना न्याय मिळवून द्यावा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळणेकामी ससंदेमध्ये आवाज उठवावा, आदी मागण्यांचे निवेदन पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी रविवारी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना दिले आहे.

या वेळी माजी नगरस सवक नंदकुमार औटी यांच्यासह प्रितेश पानमंद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पारनेर नगर, दक्षिण लोकसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण दरवर्षी पेक्षा कमी असल्याने पारनेर तालुक्यात पाण्याची टंचाई भासत असून,

जनावरांना वेळेवर चारा उपलब्ध होत नाही, त्यामुळी पारनेर व नगर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा व डेपो सुरु करावेत, मराठा आरक्षणाबाबत बीड व जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांनवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध करून आंदोलकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, मराठा आरक्षणाकरिता ससंदेमध्ये विषय मांडण्यात यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.