अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता वीज पुरवठा खंडित केला होता.
अचानक वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज कंपनीचे कार्यालय गाठले व वीज बिलाची मागणी केली. मात्र कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांनी संदेश कार्ले व रामदास भोर यांच्या कानावर सादर बाब घातली.
उक्कडगाव, नारायनडोह, निंबोडी, डोंगरगण, वाळुंज तसेच तालुक्यातील बऱ्याच गावातील जवळपास ५० ते ६० शेतकरी जमा झाले. गावातील हे शेतकरी बीजबिल भरण्यासाठी तसेच आमच्याकडे किती थकबाकी आहे व किती भरावी लागेल.
याची चौकशी करत होते दुपारी २ दोन वाजेपर्यंत हे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वाट पाहत होते. परंतु वीज बिल मात्र मिळत नव्हते शेवटी सर्व शेतकरी आक्रमक होत वीज वितरण कंपनीचे गेट बंद केले.
मात्र त्याच वेळी जिल्हा प्रमुख प्रा.गाडे सरांचा फोन आला त्यांच्या कानावर ही बाब घातली. त्यांनी त्वरित ती ऊर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घातली.
त्यांनी शेतकऱ्यांची त्वरित खंडित केलेला तालुक्यातील वीज पुरवठा त्वरित सुरू करणे, वीज बिल शेतकऱ्यांना पोहचवणे,शासनाची विजबिलाची सवलत योजना समजून सांगणे.
यासाठी कमीत कमी पाच सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याच्या बाबी लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी नगर तालुक वीज पुरवठा सुरू करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.