Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद, तूर, मका, कापूस, कांदा, फळबागा व फुल शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा नंतर शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली.
एकट्या चिचोंडी पाटील गावामध्ये १७४२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नाही, त्यामुळे शासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करण्यात आला. ३१ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर जागरण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
शासनाने मधल्या काळात काही शेतकऱ्यांचे पैसे दिले असून, सध्या उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे. एकट्या चिचोंडी पाटील गावात १७४२ शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ मधील पीक नुकसानीची रक्कम रुपये २ कोटी ६१ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिली आहे.
नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे यापुढील काळामध्ये शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी जनसंसदचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक सब्बन, वीर बहादूर प्रजापती, अशोक कोकाटे, गणेश इंगळे, कैलास खांदवे, सुनील टाक, सचिन खडके पोपटराव साठे, बबलू खोसला, विलास खांदवे, अंबादास कोकाटे, विकास कोकाटे, सतीश कोकाटे,
श्याम कोकाटे, लक्ष्मण खेडकर, शरद थोरे, महादेव खडके, दत्ता धलपे, देविदास शेळके, अंबादास शेळके, संतोष वाडेकर, लहानु वाडेकर, बाळासाहेब वाळके, नितीन खडके, सोनू कांबळे, बंडू खराडे व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे.