अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला भातावरील कीड नियंत्रणाचा ‘हा’ नवा मंत्र

Pragati
Updated:

Ahmednagar News : सध्या निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानामुळे शेतीवर विपरित परिणाम होत आहेत. विपरित हवामानाचा फटका पिकांना बसत आहे. हवामानातील बदलामुळे पिकांवर रोगराई वाढली आहे.

त्यामुळे हि रोगराई आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. परंतु यात शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होत असून दुसरीकडे उत्पन्न मात्र त्या तुलनेत कमी निघते. पर्यायाने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते.

नुकतेच अकोले तालुक्यातील राजूर गावात केंद्राच्या एनएचआरडीएफतर्फे विविध पिकांमधील कीटकनाशकांची चाचणी करण्यात आली होती. त्यात मिरची, वांगे, भेंडी तसेच इतर भाजीपाला पिकात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशके आढळून आली.

त्या अनुषंगाने भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयातर्फे एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिक या विभागाने राजूर व परिसरातील शेतकऱ्यांकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबवला.

रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय व वारेमाप वापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, त्याचबरोबर उत्पादन खर्चातही खूप वाढ झालेली आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे.

याबाबत एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे उपसंचालक डॉ. अतुल ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले तसेच पाडळणे गावचे प्रगतिशीलशेतकरी राम तळेकरयांनी सुद्धा सेंद्रीय पद्धतीने इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना आपले अनुभव सांगितले कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे सापळे, जैविक कीटकनाशके व फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षा साधनांचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते, याचाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे अधिकारी यांनी क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्यांना कीड व रोगांचे निरीक्षण करून करावयाच्या उपाययोजनांची माहिती करून दिली. या कार्यक्रमाला एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे उपसंचालक डॉ. अतुल ठाकरे, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी अमित जाधव, विशाल काशिद, वैज्ञानिक सहायक महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे यांचे सहकार्य लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe