अहमदनगर बातम्या

‘आचारसंहितेपूर्वीच शेतकऱ्यांना देणी मिळावी’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : चिचोंडी पाटील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी शेतकऱ्यांना देणी मिळावीत अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये खूपच कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाने जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. मात्र अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही.

या वर्षी कोरडा तर त्या आधी तीन वर्ष ओला दुष्काळ असुनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीचे कर्ज घेतले आणि वेळेवर त्याची परतफेड केली त्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे शासनाने ठरविले होते.

मात्र अनेक शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचे शासनाने ठरविले आहे. मात्र शेतकऱ्यांचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि जिल्हा सहकारी बँकेमार्फत घेतले गेलेला व्याज परतावा मिळालेला नाही.

नाबार्ड मार्फत मिळणारे व्याज अनुदान पशुपालकांना मिळालेले नाही. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप आलेले नाही तसेच बऱ्याच शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळली गेलेली आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी शासनाने सर्व देणे द्यावीत अशी मागणी भारतीय जनसंसदचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, सुनील टाक, वीरबहादुर प्रजापती, बबलू खोसला व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

Ahmednagarlive24 Office