नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर मदत लवकरात लवकर मिळावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कांद्याची निर्यात बंद करून आयात सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राज्य किसान सभेतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अतिवृष्टी झाल्याची सरकार दरबारी नोंद असलेल्या केवळ १५ गावांमध्येच नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याच्या मुद्यावरून तहसीलदार ज्योती देवरे व आझाद ठुबे यांच्यात खडाजंगी झाली. आता दिवाळीनंतर याच मुद्द्यावर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे ठुबे यांनी आंदोलनानंतर जाहीर केले.

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे वाटाणा, कांदा, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासकीय निकषानुसार पळशी परिसरातील पंधरा गावांमध्ये पंचनामे झाले. उर्वरित गावांचे का नाही, असा प्रश्न ठुबे यांनी उपस्थित केला. शेतीसंदर्भात केंद्र सरकारने केलेले तीनही कायदे कंत्राटीकरणाला, फसवणुकीला चालना देणारे आहेत.

शेतमालाच्या हमीभावाबद्दल कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. हे कायदे बाजार समित्या उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधणारे आहेत. त्यामुळे ते रद्द करण्याची मागणी संतोष खोडदे यांनी केली. किसान सभेचे तालुका सचिव कैलास शेळके यांनी २०१८ चा रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी केली.

नांगरटीसाठी शासनाकडून आलेले अनुदान तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. संबंधित अडचणी दूर करून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावे, वीजबिल माफ करावे,

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पात्र असूनही वंचित असलेल्या तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर मदत लवकरात लवकर मिळावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24