शेतकऱ्यांची चिंता वाढली … अतिवृष्टीने नुकसानीत भर; पंचनामे करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील सप्टेंबर महिन्यात नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. या बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय पातळीवर झाले.

मात्र नेवासे तालुका प्रशासनाकडून यासंदर्भात हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. या आपत्तीत खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर व अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

तालुका प्रशासन कधी पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करणार, असा सवाल आहे. नेवासे तालुक्यात मागील महिन्यापासून सर्व मंडलात अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी ढगफुटीचा प्रकार झाला.

यामुळे हजारो एकर क्षेत्राचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नेवासे तालुक्यात झाल्याने शासकीय पातळीवर बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश झाले.

परंतु सदर पंचनामे करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून हालचाल होताना दिसत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार. कारण आता सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत.

तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात गेल्याने जे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते ते अति पावसामुळे वाहून गेले.

तालुका प्रशासनाकडून पिकांचे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे होऊन तातडीने शासनाला अहवाल देणे गरजेचे होते. पण महिना उलटला तरी कसलीही हालचाल दिसत नसताना पुन्हा अतिवृष्टीचा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24