Ahmednagar News : शिर्डीकडे येणाऱ्या कार व कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अनियंत्रित झालेली कार कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार झाले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गांवर हा अपघात झाला.

या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार चक्कचचूर झाली होती. ही घटना काल शुक्रवार (दि.९ फेब्रुवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा होता.

यादरम्यान त्यातील चॅनल खाली पडलेला होता. हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डीकडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव येत होती.

स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनरवर जाऊन आदळली.

यां अपघातात कार चक्काचूर झाली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर एकजण जखमी असून त्याला उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थही त्या ठिकाणी धावले. चौघाचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू होती. अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा अपघातच्या घटना दिवसाआड होऊ लागलेल्या आहेत.

यातील मृतांचे प्रमाण देखील जास्त असल्याचे ही चिंतेची बाब आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण धोकादायक आहे.

नुकतंच दोन दिवसांपूर्वीच देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचाही या महामार्गावर अहमदनगरमध्येच अपघात झाला होता.

आता रात्री पुन्हा ही घटना घडली आहे. चौघांचा बळी यात गेला आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास करत आहेत. लवकरच मृतांची नावे व इतर माहिती समोर येईल.