अहमदपूर-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अपघातांच्या काही घटना ताजा असतानाच आता एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. अहमदपूर-अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झालाय. यामध्ये पाच जण ठार झाले आहेत.

पिकपमधील तिघे व कंटेनरमधील दोघे असे पाच जण मृत झाले. प्रल्हाद सीताराम घरत (वय 63), नितीन प्रल्हाद घरत (वय 41) ( रा. महाजनवाडी जि. बीड), विनोद लक्ष्मण सानप (वय 40 रा. वाघिरा जि.पाटोदा), अन्य दोघांची ओळख पटली नव्हती अशा पाच जणांचा समावेश आहे.

अपघातानंतर कंटेनर मधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरले होते. त्यामुळे बराच काळ वाहतूक चक्काजाम झाली होती. बीड जिल्ह्यात मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअप यांची झालेली धडक इतकी भीषण होती की,

सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकत्र अडकलेल्या वाहनांचे पत्रे काढण्यासाठी यंत्र मागवून घ्यावे लागले. रात्री 10 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणली गेली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत झाली.

अपघाताची माहिती कळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह बाहेर काढत व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. या अपघातामध्ये पितापुत्रांचाही समावेश आहे.