अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-खर्डा येथील श्रीछत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या जागेची मंडलाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास १५ दिवसांत सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर बागडे पिता-पुत्रांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोरील उपोषण मागे घेतले.
खर्डा येथील श्रीछत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संचलित श्रीछत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, संत गजानन महाराज महाविद्यालय, प्रगती कला महाविद्यालय खर्डा यांच्या सचिव व संचालक मंडळातील सदस्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी श्रीराम बागडे व गौरव बागडे या पिता-पुत्रांची फसवणूक करून संस्थेच्या मान्यता व संलग्नता घेतल्या.
त्यांची मान्यता रद्द करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बागडे पिता-पुत्र आमदार पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. मागणीची दखल घेऊन तहसीलदारांनी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना उपोषणस्थळी पाठवले. लांडगे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बागडे पिता-पुत्राने उपोषण मागे घेतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved