अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केलेला आहे. या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असुन नद्या-नाल्यांना पूर आला आहे.
यांमुळे मात्र सर्वाधिक नुकसान खरीप पिकांचे झालेले आहे.अगोदरच पावसाने मुगाचे उत्पादन डागी बनविले असताना आता कपाशी,बाजरी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.परिसरातील शेत शिवारांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. नद्या-नाल्यांना पुर आल्याचे चित्र परिसरात पाहाव्यास मिळत आहे.
यावर्षी मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस होत आलेला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. कोरोनाच्या काळात उत्पन्न चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे.
बोधेगाव भागात आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांना पुर आला होता. तसेच खरीपाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्या मात्र जीवितहानी कुठेही झाली नसल्याचे सुत्रांकडुन समजले.कपाशी,बाजरीसह ऊसाचे पीकावर याचा मोठा परिणाम झाला असुन अतिपावसामुळे कपाशी लाल पडली आहे.कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचुन तळे साचल्याने त्याचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.
बोधेगावमध्ये तर एका रात्रीत तब्बल १५२ मिमी पाऊस कोसळला असल्याचे समजले. आता शेतात साचलेल्या गुडघाभर पाण्याचा निचरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे.या साचलेल्या पाण्याने पीके जागेवर जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved