कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवसाळीच्या सणात जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी दरोडा, चोरी, लूटमार आदी घटनांना वेग आला आहे.

यातच कोपरगाव तालुक्यात एक लुटमारीची घटना घडली हं. कोयत्याचा धाक दाखवून डॉ. रमेश गोसावी यांना एकाने लुटले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉ. रमेश मुरलीधर गोसावी (वय ६७, सा. रेव्हेन्यू कॉलनी, वार्ड नं. १, श्रीरामपूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,

रात्री आपण क्लिनिक बंद करुन आपल्या कारने (नं. एमएच १७, एजे ७०९२) निघालो असता लक्ष्मी थिएटर शेजारी आरोपी शादाब हा स्कुटीवर आला. मला कारच्या बाहेर ओढून लोखंडी कोयत्याने मारण्याचा धाक दाखवत दमदाटी करू लागला. त्यानंतर त्याने मला मारहाण करुन तसेच कारवर दगड मारुन कारची काच फोडून नुकसान कारचे केले.

तसेच माझ्या शर्टच्या खिशातील १ हजार रुपये रोख रक्कम स्टेट बँकेचे एटीएम कार्ड, आधार कार्ड बळजबरीने लुटून नेले. आरोपी स्कुटीवरुन पसार झाला. घटनेची खबर मिळताच डिवायएसपी संदीप मिटके, शहर पोलीस स्टेशनचे भापोसे आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपी शादाब याचा सपोनि पाटील हे कसून शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24