कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवले ‘जीवन’

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. त्यातच परत कोरोनाची भर पडल्याने तर ‘घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे’अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यात डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तसेच कोणत्याही प्रकारची दोन पैसे हातात पडण्याची शक्यता दिसत नसल्याने पाथर्डी तालुक्यातील भोसे गावातील शेतकरी आसाराम नानाभाऊ टेमकर (वय वर्षे ६०)

यांनी याच कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Advertisement

आसाराम टेमकर यांनी सेवा संस्था व एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची त्यांना परतफेड करणे शक्य होत नव्हते. इतरही काही व्यक्तींकडून त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते.

त्यांचाही तगादा वाढला होता. या सर्व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शुक्रवारी ७ जानेवारीला शेतामध्ये विषारी औषध घेतले याची माहिती समजताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान १० जानेवारीला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement