अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात दरदिवशी आत्महत्येच्या घटनांमध्ये देखील कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे.
सासरच्या ञासाला कंटाळून महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सौ. सोनाली बाळकृष्ण बाबर (वय 28 ), तर मुलगा रोहीत बाळकृष्ण बाबर (वय 03) अशी मयतांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, सासरच्या मंडळींनी वेळोवेळी मयत सोनाली हिला माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत सातत्याने तिचा छळ सुरु केला.
तसेच अनेकदा सासरच्या मंडळींकडून पीडित सोनाली हिला मारहाण शिवीगाळ, दमदाटी करुन तिला उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. या छळास कंटाळून सोनाली हिने दि. 23 ऑक्टोबरला पिंपळगाव माळवी येथील तलावाच्या पाण्यात तिच्या मुलगा रोहीत याच्यासह उडी मारुन आत्महत्या केली आहे.
याबाबत मयत सोनाली हिचा भाऊ प्रशांत काळुराम विशे (रा. शिवाजीनगर कल्याणरोड ता.जि अ.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरून बाळकृष्ण पांडुरंग बाबर (नवरा), जीजाबाई पांडुरंग बाबर (सासू), निलेश पांडुरंग बाबर (दिर), बाबासाहेब भाऊ बाबर (चुलत दिर सर्व रा. पिंपळगाव माळवी ता.जि अ.नगर) या चौघांविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved