शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पंधरा एकरावरील ऊस पेटला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील साकेवाडी परिसरातील नऊ ते दहा शेतकऱ्यांचा जवळपास चौदा ते पंधरा एकर ऊस जळून खाक झाला आहे

अनेक ठिकाणी विजमंडळाच्या हलगर्जीपणामुुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस पेटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे वीज मंडळाने त्यांच्या कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऐन गळीत हंगामात ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आज दि१२रोजी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली

त्यात मोठ्या प्रमाणात ऊस जळाला त्यानंतर आज दुपारी पुन्हा विजेची तार तुटून उसात पडली त्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांच्या उसाने पेट घेतला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24