अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : नोकरी अर्ज भरताना वीस रुपये चार्ज भरण्याचा मेसेज आला. ओटीपी देताच तरुणाच्या बैंक खात्यातून परस्पर पंधरा हजार रुपये काढले. याप्रकरणी कुकाणे येथील तरुणाने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली.
येथील राजन पांडुरंग देशमुख हा दि.२ जून रोजी एका संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज भरताना वेबसाईटकडून एसएमएस चार्जेससाठी २० रुपये अदा करण्यास सांगितले.
पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठवतांना अनेक वेळा ओटीपी प्राप्त झाला आणि वीस रुपयांची रक्कम पाठवताना त्याच्या बँक खात्यातून मात्र १५ हजार रुपये काढून घेतले.
मोठी रक्कम वजा झाल्याचे पाहून त्यांनी संकेतस्थळाच्या कस्टमर सर्विसला फोन करून विचारणा केली. त्यांनी पैसे आम्हाला मिळाले नसल्याचे उत्तर दिले. अनेक वेळा विनंती करून पैसे परत न मिळाल्याने देशमुख यांनी नगरच्या सायबर क्राईम सेलला तक्रार नोंदवली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews