अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवण्यावरून दोन गटात मारामारी झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता इंदिरानगर येथील रसाळ हॉस्पिटलसमोर घडली.
परस्परविरोधी फिर्यादींवरून नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश सोमनाथ पोगूल याने वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने अमित राहतेकर याने लाकडी दांडक्याने त्याला मारहाण केली.
राहतेकरलाही पोगूळ परिवाराने जबर मारहाण केली. पोलिसांनी अमित रहातेकर, धिरज रहातेकर, सूरज गाडे व इतर दोघे, तसेच योगेश पोगूल, कल्पेश पोगूल, सोनू गोफणे, योगेशची आई व पत्नी आदी १० जणांवर गुन्हा दाखल केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved