अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- बिबट्या हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांना घाम फुटतो. बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी दोन बिबट्याची थराराकरित्या झुंज रंगलेली पाहायला मिळाली.
मात्र हे पाहताच प्रत्यक्षदर्शींना चांगलाच घाम फुटला. दरम्यान हि घटना श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे घडली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,आजपर्यंत बिबट्याने माणसे, शेळ्या, कुत्री यांच्यावर हल्ले केले आहेत.
मात्र आज खानापूर येथील हरिभाऊ भानुदास आदिक यांच्या वस्तीवर चक्क बिबट्यानेच बिबट्यावरच हल्ला केल्याची घटना घडली. या झुंजीत एका बिबट्याने दुसऱ्याच्या डोक्यावर पंजाचा जोरदार प्रहार केला.
त्यामुळे दुसरा बिबट्या रक्त भंबाळ होऊन खाली पडला. अचानक बिबट्यांची सुरू झालेली झुंज पाहून वस्तीवरील ग्रामस्थांच्या काळजाचा थरकार उडाला.
यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या आरडाओरडीने एक बिबट्या उसाच्या शेतात पळून गेला, तर दुसरा बिबट्या आदिक यांच्या शेडमध्ये घुसला. त्यानंतर काही क्षणातच तो बेशुद्ध पडला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी बिबट्यास श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. ग्रामस्थांनी प्रथमच दोन बिबट्यांची झुंज पहिली, मात्र घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved