Ahmednagar News : काँग्रेसचे किरण काळेंवर गुन्हा दाखल करा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे अंकुश चत्तर यांच्या खुन प्रकरणाबाबत काँग्रसचे किरण काळे यांनी बेताल ‘व चिथावणीखोर वक्‍तव्य केले असून यामुळे कै. चत्तर यांचे कुटुंबिय नातेवाईक आक्रमक झाले आहेत.

काळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले. यावेळी मयत अंकुश चत्तर यांचे मेव्हुणे बाळासाहेब सोमवंशी, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते. अहमदनगर शहरात पाईपलाईन रोड येथील एकविरा चौक येथे सामाजिक कार्य करणारे अंकुश चत्तर या युवकाची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केली होती.

त्यानंतर त्या आरोपीना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या अटक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस प्रशासनातर्फेच खुलासा करण्यात आलेला आहे. चत्तर यांची अंतयात्रा ही त्यांच्या राहते घरापासून काढण्यात आली होती. दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान सर्व दुकाने हे दुकान मालक यांनी स्वतःहून बंद ठेवून एक प्रकारची आदरांजली वाहीली होती. मात्र आज आम्ही किरण काळे नामक व्यक्‍तीची एक व्हिडीओ क्लीप पाहिली व ऐकली असून त्यामध्ये ते असे म्हणतात की, सदरचे दुकाने हे गुंडगीरी करुन व धमकी देऊन बंद ठेवण्यात आले होते.

त्याबाबत त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांनी मयताची बदनामी होईल व मयत हा गुंडगीरी करणारा आहे. असे भासविण्याकरिता सदरचे वक्तव्य केलेले आहे. सदर अंतयात्रेच्या मार्गावरील दुकानदारांनी याबाबत कुठलेही तक्रार पोलीस प्रशासनाकडे केलेली नसून त्याबाबत पोलीस प्रशासनाकडे ही कुठलीही माहितीची नोंद नाही.

तसेच सदर मार्गावर सी.सी.टी.व्ही. फुटेज असून सदरच्या फुटेजमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचेच दिसून येत आहे. काळे वांनी मयत अंकुश चत्तर यांना समाजातून मिळत असलेल्या भावनिक साथीला कुठेतरी चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज पाहण्याकरिता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्‍ती व्हावी, यालाही ते विरोध केला आहे. तसेच किरण काळे यांनी मयत अंकुश चत्तर यांच्यावर या आधी १६ गुन्हे दाखल आहेत, असे खोटे व चुकीचे वक्‍तव्य केलेले आहे.किरण काळे यांनी मयताची बदनामी करुन मयताची प्रतिमा मलिन करून आमच्या परिवाराच्या भावना दुखवल्या आहेत.

या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्‍वासन चत्तर यांच्या नातेवाईकांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe