अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करुन नेवासे येथील तहसील कार्यालयात जल्लोषात वाढदिवस साजरा करणाऱ्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करावे.
तसेच त्यांच्यावर करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.
दहातोंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. “त्या’ धिकाऱ्याने केलेल्या या गैरप्रकाराची तत्काळ चौकशी करावी. तसेच ही कारवाई येत्या आठ दिवसांत पूर्ण करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
अन्यथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दहातोंडे यांनी दिला आहे. दहातोंडे म्हणाले, “”नगर जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी कुठेही गर्दी करु नये, अशी ताकीद दिली आहे. ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तहसीलदारांसह महसूल व पोलीस दलाच्या अन्य अधिकाऱ्यांवर आहे.
मात्र, त्याकडे दूर्लक्ष करुन अधिकारीच स्वत:च्या वाढदिवसाचे इव्हेंट करत आहेत. ही गंभीर घटना आहे. मंगळवारी (ता.23) नेवासा तहसील कार्यालयात केक कापून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.” उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनाही दहातोंडे यांनी निवेदन पाठविले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews