अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
तसेच जिल्ह्यात दरदिवशी महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. नुकतेच नेवासा तालुक्यात महिला हिंसाचाराची घटना घडली आहे.
लग्नानंतर दोन वर्षांनी पतीसह सासरच्या मंडळींनी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद एक महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सासरच्या मंडळींवर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे काजल तुकाराम काळे वय वर्षे 30 ने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की माझे लग्न 19 एप्रिल 2017 रोजी तुकाराम रावसाहेब काळे राहणार पुणे यांच्याशी झाले होते.
लग्नाच्या काही वर्षांनंतर सासरच्या मंडळींकडून मला मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. सासू सज्जन बाई रावसाहेब काळे, सासरे रावसाहेब नामदेव काळे, पती तुकाराम काळे यांच्याकडून सातत्याने माझी छळवणूक केली जात आहे.
तसेच आई-वडिलांकडूनअर्धा तोळ्याची अंगठी घेऊन ये असे म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून उपाशीपोटी ठेवून माझा छळ केला आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved