अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये रमेश जाधव, बाळासाहेब जाधव व सुनीता जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा विवाह नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रमेश बाळासाहेब जाधव याच्यासोबत झाला होता.
पती रमेश, सासरा बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव यांनी पैशासाठी छळ केल्याने कोमलने आत्महत्या केल्याप्रकरणी सुरूवातीला पती, सासू सासऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून आपल्या मुलीला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले,
असा आरोप केला होता. याप्रकरणी अधीक्षक पाटील यांनी तात्काळ दखल घेत पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याला दिले होते.
त्यानुसार पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी रमेश जाधव याला अटक केली असून सासरा बाळासाहेब व सासू सुनीता यांना अटक केलेली नाही. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भोगे कुटुंबाने केली आहे.