भाडेकऱ्यास मारहाणप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- आदिवासी कुटुंबातील पती-पत्नीला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून राहुरीतील कोरडे पिता-पुत्रावर विनयभंग, तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात विजय रंगनाथ कोरडे यांच्या मालकीच्या कोरडे बिल्डिंगमध्ये ही घटना घडल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

या बिल्डिंगमध्ये संबंधुत आदिवासी कुटुंब गेल्या दीड वर्षापासून भाड्याने राहत आहे. १८ ऑगस्टला घरात वापरायचे पाणी नसल्यामुळे या कुटुंबाने घरमालकाकडे जाऊन पिण्याचे पाणी चालू करावे, अशी विनंती केली असता घरमालक विजय

कोरडे, तसेच त्यांचा मुलगा प्रसाद विजय यांनी पाणी देणार नाही, असे सांगून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24