अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भूखंड पाहिजे असेल तर तुला माझ्याशी शारीरिक संबध ठेवावे लागतील, असे सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाथर्डी बाजार समितीच्या उपसभापतीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेंद्र विलास गर्जे( रा. पागोरी पिंपळगाव) यांच्याविरुद्ध बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्याबाबत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड वाटपाबाबत वृत्तपत्रातील जाहिरात वाचून तालुक्यातील एका गावातील महिलेने भूखंड मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जावर दिलेल्या फोन नंबरवर गर्जे याने फोन केला. माझी पत्नी बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भूखंड पाहिजे असेल तर मला भेट, असे सांगितले.
सदर महिला पाथर्डीत आली तेव्हा गर्जे याने तिला दि.१८ ऑगस्ट २०२१ रोजी पावणेतीन वाजता एका लॉन्सजवळीत गाळ्यात घेवून गेला त्यानंतर शटर बंद करून तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत कोठे काही सांगितल्यास जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली.
त्यानंतर सदर महिला तिच्या गावी गेली. पुन्हा २२ ऑगस्ट २०२१ रोजी गर्जे याने महिलेच्या गावी जाऊन तिच्या घरात घुसून पुन्हा अत्याचार केला. मात्र महिलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीने धीर दिल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गर्जे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे राजेंद्र गर्जे याने सदर महिला व तिच्या पतीविरुद्ध दहा लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार नोंदविली आहे. फोनवर झालेल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करून बाजार समितीमध्ये भूखंड दे नाहीतर दहा लाख रुपये दे,
असे म्हणत या महिलेने व तिच्या पतीने दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे राजेंद्र गर्जे याचे म्हणणे असून पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या पती विरोधात तक्रार दिली आहे.