अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील खड्डेमय रस्ते. नागरिक आता नगरसेवकांना हैराण करत आहेत, याला वैतागून महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना पक्षाच्याच एका नगरसेवकाने प्रभागातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा महानगरपालिकेच्या इमारतींवरून उडी मारून आत्महत्या करतो असा निर्वाणीचा इशारा महापौर आणि आयुक्तांना दिला आहे.
खड्डेच खड्डे चोहीकडे अशीच काहीशी परिस्थिती सध्या अहमदनगर शहराची झाली आहे. याच खड्ड्यांतून मार्ग काढताना नगरकरांचा संताप अनावर होत आहे.
विशेष म्हणजे रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी चक्क सत्तेत असलेल्या नगरसेवकालाच आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे.
अहमदनगर महापालिका हद्दीतील बोल्हेगाव परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाल्याने या प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांनी खड्डे बुजवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येत्या आठ दिवसात या भागातील खड्डे महापालिकेने बुजवले नाही तर शेकडो नागरिकांसह महापालिका इमारतीवरून उडी घेण्याचा इशारा आढाव यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन आढाव यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे आणि महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले आहे.