Ahmednagar News : मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ५३ गावातील १५६०० शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील वर्षी शासनाने तातडीने पंचनामे केले परंतु, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वर्षे उलटले तरीही मिळाली नव्हती त्यासाठी आ. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर ही मदत मिळाली आहे. या मदतीसाठी केवासी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होणार आहे.
आ. राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच मागणी मंजुर करत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अर्थिक हातभार लागणार आहे.
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा एक वर्षापासुन रखडलेला प्रश्न मार्गी लावुन तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकरी वर्गमधून आभार व्यक्त केले जात आहे.