अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्या’ ९१ वर्षांच्या आजींनी उपोषण सोडले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच तेथे येणाºया सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या ९१ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वनखात्याच्या लेखी व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले.

अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून ९१ वर्षीच्या हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार व अन्यप्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

Advertisement

पहिले दोन दिवस वनविभागाच्या अधिकाºयांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्पळ ठरले. काल रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणास बसलेल्या हौसाबाई नाईकवाडी यांची आमदार किरण लहामटे,

अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम, तहसीलदार सतिष थेटे, राजूरचे वन परीक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्यासंदर्भात चर्चा केली.

आमदार डॉ. लहामटे यांनी सांगितले, की कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोद्धार करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असून भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. आमदार डॉ. लहामटे यांनी त्यांना नारळ पाणी दिल्याने अखेर तिसऱ्या दिवशी आपले उपोषण सोडले.

Advertisement