अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत नगरपरीषद होणे करीता नगरविकास मंत्रालयाने अध्यादेश जारी केला असून शिर्डी नगरपरीषद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याला निर्णयामुळे शिर्डी करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले होते.
नामनिर्देशन फाँर्म भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने शुक्रवार दि.३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाने शिर्डी नगरपंचायतीच्या दर्जा वाढ करून शिर्डी नगरपरीषद घटीत करण्याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.
निवडणूक आयोगाचा निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा अध्यादेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू राहाणार आहे.
निवडणूक आयोगाचे शिर्डी नगरपंचायत निवडणूक रद्द करण्याबाबत आदेश जारी झाले तरीदेखील दि.२७ डिसेंबर २०२१ नंतर शिर्डी नगरपंचायतवर प्रशासक राजवट लागू होवू शकते.
नगरविकास खात्याने शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देणेबाबत तातडीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच या अधिसूचनेबाबत शिर्डी ग्रामस्थांना कोणताही आक्षेप असेल तर दि. ३ डिसेंबरपासून ३० दिवसाच्या आत आपला लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविणे आवश्यकआहे.