अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव व जोरापुर गावाची दोन स्वस्त धान्याची दुकाने सील करण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा विभागाचे निरीक्षक प्रभाकर उमाप,अभिजीत वांडेकर,तालुका पुरवठा निरीक्षक पवन बिघोत यांच्या पथकाने ही दुकाने सील केली आहे.
हिंगणगाव,जोहरापुरची दुकाने तपासणीसाठी हे पथक गावात आले होते.त्यावेळी दुकाने बंद होती.अधिकाऱ्यांनी संबंधित दुकाने चालकाला भ्रमणध्वनीवरून यांची कल्पना दिली व दुकाने उघडण्यास सूचना केल्या.
परंतु दुकान चालक दुकानाकडे फिरकलेच नाही. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ही दुकाने पंचनामा करून सील केलीआहेत.तपासणीसाठी दुकाने उघडली नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
तालुक्यातील अफरातफर करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्याची मोहीम जिल्हा पुरवठा अधिकारी हाती घेतली असून महिन्यापूर्वी शेवगाव शहरातील पाच स्वस्त धान्य दुकाने सील करून
दहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या कारवाईमुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews