अखेर पंडित नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग हटवला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लालटाकी येथील पंडित नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने गुरुवारी (७ जानेवारी) मनपात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शुक्रवारी एक होर्डिंग काढण्यात आला.

हा होर्डिंग मनपाने काढला की वैयक्तिक काढला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मनपाने दिले नाही. काँग्रेसने गुरुवारी मनपात ठिय्या आंदोलन करत १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंती दिनी हे फलक हटवले जातील, असा इशारा दिला होता.

त्यावेळी मनपाने होर्डिंग हटवण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी दुपारनंतर पंडित नेहरू पुतळा उद्यान परिसरातील एक मोठा होर्डिंग हटवण्यात आला आहे.

परंतु, होर्डिंग मनपाने हटवला की वैयक्तिक याबाबत स्पष्ट होऊ शकलेले नाही. पुतळा परिसरातील इतर होर्डिंग अजूनही जैसे थे आहेत, याप्रकरणी मनपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24