Ahmednagar News : आग्रही मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात अखेर पाणी सोडण्यात आले. यापूर्वी २६ एप्रिल २०२४ रोजी निळवंडे उजवा कालव्याचे लाभार्थीस आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर काल बुधवारी (दि.१५) निळवंडे धरणातून उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून सदर पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचून त्याचे योग्य वाटप व्हावे, यासाठी आमदार तनपुरे स्वतः प्रयत्नशील आहे.
पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी काही अडचणी येत होत्या. त्या अडचणींची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना केल्या. कालव्यापर्यंत पोहोचणारे पाईप देखील आमदार तनपुरे यांनी पुरवले. या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी वडनेरचे किरण गव्हाणे, कनगर येथील अनिल घाडगे, सुयोग नालकर, नवनाथ मुसमाडे, भाऊसाहेब आडभाई, लक्ष्मण घाडगे, प्रकाश नालकर, वसंत गाडगे, चिंचविहिरेचे शब्बीर पठाण, भगीरथ नरोडे आदी उपस्थित होते.