महिला बचत गटांना आर्थिक दिलासा; बॅँकेने दिले आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात करोना काळात महिला बचत गटांना अर्थसाह्य करणार्‍या संस्था (मायक्रो फायनान्स) यांच्याकडून सक्तीची वसुली किंवा दमदाटी या सारख्या घटना घडत आहे.

याची सत्यता तपासण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पदाधिकारी व कर्मचारी यांची शनिवारी बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी या बचत गटाच्या महिला प्रतिनिधींकडून सक्तीने वसुली करू नये,असे आदेश शनिवारी अग्रणी बँकेच्यावतीने देण्यात आले आहेत.

करोना सारख्या साथ रोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत.

यावेळी या मायक्रो फायनान्स यांनी महिला बचत गट आणि हातावर व्यवसाय असणारे यांच्याकडून सक्तीने वसुली करण्यात येऊ नये, असे अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

कोणी कर्जदारावर अशा प्रकारचा अन्याय किंवा दमदाटी होत असेल त्यांनी 1800-102-1080 या क्रमांकावर त्यांची तक्रार नोंदवावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24