जाणून घ्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पावसाची नोंद झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या, धरणे, बंधारे, तलाव दुथडी भरून वाहिले होते.

यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यात नगर शहरातील नालेगाव महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून संगमनेर आणि श्रीरामपूर मंडलातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

यामुळे आतापर्यंत 663.9 च्या सरासरीने 141.2 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. जाणून घेऊया जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी नालेगाव मंडला 80, सावेडी 48.8, कापूरवाडी 29.5, केडगाव 49.3, नागापूर 28.3, वाळकी 37.3 असा पाऊस झाला.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर मंडलात 45, बेलवंडी 23.3 (श्रीगोंदा), कोंभळी 29.3 (कर्जत), खर्डा 29.3 (जामखेड), ब्राम्हणी 32.3, वांबोरी 37.5 (राहुरी), संगमनेर 55.8, डोळसणे 29.5, दहीगाव बोलका 31.8 (कोपरगाव),

श्रीरामपूर 42.5, बेलापूर 28.5, उंदिरगाव 47 (श्रीरामपूर), शिर्डी 23.5, लोणी 32.3 आणि बाभळेश्वर 43.3 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बहुतांशी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असे आवाहन शेतकरी करत आहे.