अहमदनगर बातम्या

धान्याच्या गोडाऊनला आग,लाकडी साहित्य जळून खाक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथे शासकीय गोडऊनला लागलेल्या आगीत दवाखान्याचे लाकडी साहित्य जळून खाक झाले. आगीची ही गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.

सन १९७२ मध्ये महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला होता, त्यावेळी राशीन व परिसरातील जनतेसाठी धान्य पुरवठा करण्यासाठी हे गोडाऊन बांधण्यात आले होते. ५२ वर्षांपूर्वीच्या या गोडाऊनला गुरुवारी अचानक आग लागली.

आगीत जुन्या सरकारी दवाखान्याचे लाकडी साहित्य जळून खाक झाले. या गोडवाभोवती वेड्या बाभळी व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे गोडऊन बंद अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे तेथील हानी टळली.

लागलेल्या आगीमध्ये गोडाऊनच्या खिडक्या जळाल्या. आगीची माहिती कळताच राशीन येथील पोलीस हवालदार हनुमंत पोकळे, राशीनचे ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, कामगार तलाठी जितेंद्र गाढवे, मंडलाधिकारी विश्वास राठोड,

योगेश सोनवणे, इम्रान काझी, संतोष सुरवसे, बापू साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्जत नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या गाडीने ही आग आटोक्यात आणून विझवली.

Ahmednagarlive24 Office