Ahmednagar News : खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला काल गुरूवार (दि.२) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी, टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य आगीत जळून खाक झाले.
दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. आगीचे लोट एवढे मोठे होते की, यामध्ये अक्षरशः एक दुचाकी व सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे.
परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमन व तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यामध्ये घरातील संसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.